BMC Clerk Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 01846 रिक्त जागांची भरती ; ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!

BMC Mumbai Bharti 2024

BMC Clerk Recruitment 2024 – मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे , नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मुंबई महापालिकेत ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनाम लिपिक) या पदासाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध खात्यातील या गट- क पदासाठी उमेदवारांची निवड ही सरळसेवा परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या पूर्वीच्या अटी रद्द करून नव्याने जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अजूनही अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा.

एकूण 1846 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BMC Clerk Bharti 2024 : Brihnmumbai Municipal Corporation office is recruiting for 1846 posts. Clerk posts to be filled by BMC. Last date to apply online is 11 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

BMC Clerk Vacancy 2024

एकूण पदे : 1846

पदांचे नाव : कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव ‘लिपिक’)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी + 10वी किंवा 12वी मध्ये मराठी व इंग्रजी विषय घेऊन पास झालेला असावा + इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र + MSCIT प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर मधील ऑपरेटिंग सिस्टीम , वर्ड प्रोसेसिंग , खेडशिट , प्रेझेंटेशन , डेटाबेस सॉफ्टवेअर , ई-मेल व इंटरनेट इत्यादी विषयी ज्ञान असावे.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 900/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : दरमहा 25,500/- ते 81,100/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.mcgm.gov.in

How to Apply for BMC Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :