---Advertisement---

Current Affairs in Marathi : 2024 मधील भारतरत्न पुरस्कार आणि पुरस्काराविषयी इतर महत्वाची माहिती

By MahaJobKatta

Updated On:

Current Affairs in Marathi
---Advertisement---

Current Affairs in Marathi : 2024 या वर्षी केंद्र सरकार ने जाहीर केलेले 132 पद्म पुरस्कार तसेच 05 भारतरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेला 01 महाराष्ट्र भूषण (2023) पुरस्कार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व महत्वाच्या पुरस्कारांवर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या सर्व पुरस्कारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असणे देखील महत्वाचे आहे. सर्वप्रथम आपण भारतरत्न पुरस्काराविषयी माहिती बघू.

भारतरत्न पुरस्कार इतिहास

पुरस्काराची ऐतिहासिक पार्श्वभूमी :

  • भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
  • सुरुवात : 1954 पासून
  • पुरस्काराचे स्वरूप : रक्कम दिली जात नाही
  • पुरस्कार राष्ट्रपतींद्वारे दिला जातो.

पुरस्काराचा आकार : पिंपळाच्या पानाच्या आकाराचे ताम्रपट , 59 मि. मी. लांब आणि 48 मि. मी. रुंद , 3 मि. मी. जाड. ताम्रपटाच्या पुढच्या बाजूला मध्यभागी सूर्याचे प्लॅटिनम धातूपासून तयार केलेले चित्र असते , तर पाठीमागील बाजूस अशोक स्तंभ व त्याला लागूनच सत्यमेव जयते असा संदेश लिहिलेला असतो.

Current Affairs in Marathi :

2024 या वर्षीचे पुरस्कार हे 27 व्या क्रमांकाचे आहेत तर आत्तापर्यंत भारत रत्न 53 व्या व्यक्तीला देण्यात आले आहे.

भारत रत्न पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच पाच व्यक्तींना भारत रत्न देण्यात आला आहे.

  1. कर्पुरी ठाकूर (मरणोत्तर)
  2. लालकृष्ण अडवाणी
  3. चौधरी चरणसिंह (मरणोत्तर)
  4. पी. व्ही. नरसिंहराव (मरणोत्तर)
  5. डॉ. एम. एस. स्वामिनाथन (मरणोत्तर)

कर्पुरी ठाकूर यांच्याविषयी :

  • भारत रत्न प्राप्त बिहार मधील चौथे व्यक्ती आहेत.
  • भारत रत्न प्राप्त 49 वी व्यक्ती
  • बिहार मधील पहिले – डॉ. राजेंद्र प्रसाद , दुसरे – जयप्रकाश नारायण आणि तिसरे – उस्ताद बिस्मिल्ला खां
  • कर्पुरी ठाकूर यांचा जन्म नाभिक कुटुंबातील असून त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील पीतोझिया गावात झाला आहे.
  • मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्ह्णून त्यांची ओळख असून त्यांना जननायक असेही संबोधले जाते.
  • बिहारचे दोन वेळेस मुख्यमंत्री :
    • 22 डिसेंबर 1970 ते 02 जून 1971
    • 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979
  • 1952 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली
  • कर्पुरी ठाकूर हे बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले.
  • महात्मा गांधी यांच्यासोबत “भारत छोडो” आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांना 26 महिन्यांचा कारावास झाला.
  • कर्पुरी ठाकूर यांनी घेतलेले क्रांतिकारी निर्णय :
    • 1967 मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर बिहारमधील मॅट्रिकच्या परीक्षेत असणारी इंग्रजी विषयाची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला.
    • आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले.
    • बिहारमध्ये उर्दूला दुसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला.
    • मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची शिफारस मुंगेरीलाल आयोगाकडे केली होती. त्यांची अंमलबजावणी त्यांनी केली. त्यांनी मागासवर्गीयांसाठी 12 % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.

लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी :

  • अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानमधील कराची येथे 08 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला.
  • भारत रत्न प्राप्त 50 वी व्यक्ती
  • भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद
  • पाच वेळा लोकसभा सदस्य , चार वेळा राज्यसभा सदस्य
  • देशाचे गृहमंत्री व उपपंतप्रधान ( सातवे )
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भारत रत्नाने गौरविले जाणारे भाजपचे दुसरे नेते ठरले
  • लालकृष्ण अडवाणी हा सन्मान मिळवणारे 32 वे राजकीय व्यक्ती ठरले
  • 2015 साली त्यांना पद्मविभूषण प्राप्त.
  • ‘माय कंट्री माय लाईफ’ नावाने पुस्तक लिहिले.
  • अडवाणींनी मध्ये ‘सोमनाथ ते अयोध्या’ अशी रथयात्रा काढली.

पी. व्ही. नरसिंहराव यांच्याविषयी :

  • देशाचे नववे पंतप्रधान – 1991 ते 1996
  • 1991 सालापासून जागतिकीकरण , मुक्त आर्थिक धोरण आणि खाजगीकरणाच्या धोरणाचा स्वीकार करत नरसिंहराव सरकारने आर्थिक सुधारणांना सुरुवात केली.
  • 1957 मध्ये आंध्र प्रदेशातील मंथन विधानसभा क्षेत्रातून निवड झाली. याच मतदार संघातून सलग 20 वर्षे ते निवडून आले.
  • 1977 मध्ये पहिल्यांदा हनमकोंडा लोकसभा मतदार संघातून त्यांची निवड झाली.
  • 1984 व 1989 या दोन लोकसभा यांनी रामटेकमधून (नागपूर) लढविल्या
  • इंदिरा गांधी यांच्या काळात ते संरक्षण मंत्री होते.
  • पी. व्ही. नरसिंहराव यांना ‘भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक’ म्हणतात.
  • डॉ पी. व्ही. नरसिंह राव यांचे आत्मचरित्र : द इनसायडर (The Insider)

चौधरी चरणसिंह यांच्याविषयी :

  • चौधरी चरणसिंह उत्तरप्रदेश चे दोन वेळेस मुख्यमंत्री
    • पहिल्यांदा – 03 फेब्रुवारी 1967 ते 25 फेब्रुवारी 1968
    • दुसऱ्यांदा – 17 फेब्रुवारी 1970 ते 01 ऑक्टोबर 1970
  • देशाचे पाचवे पंतप्रधान
    • 28 जुलै 1979 ते ऑगस्ट 1980
  • 1967 साली काँग्रेस मधून बाहेर पडून ‘भारतीय क्रांती दल’ हा पक्ष स्थापन केला.
  • सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिका मांडणारे चरणसिंह चौधरी यांचा जन्मदिवस 23 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • चौधरी चरणसिंह यांची ग्रंथसंपदा :
    • जमीनदारी निर्मूलन
    • भारतातील गरिबी व त्यावर उपाय
    • शेतकऱ्यांची भूसंपत्ती की शेतकऱ्यांची जमीन
    • प्रिव्हेंशन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम
    • को – ऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड

डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्याविषयी :

  • एम. एस. स्वामिनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात.
  • एम. एस. स्वामिनाथन यांचे पूर्ण नाव – डॉ. माणकोंबू सांबशिवन स्वामिनाथन
  • निधन – 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी
  • कृषी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या.
  • 1988 साली चेन्नई येथे एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन ची स्थापना केली.
  • एम. एस. स्वामिनाथन यांना मिळालेले पुरस्कार :
    • 1961 – शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार
    • 1971 – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
    • 1986 – अल्बर्ट आइन्स्टाइन जागतिक विज्ञान पुरस्कार
    • 1987 – पहिला जागतिक अन्न पुरस्कार
    • 1991 – टायलर पुरस्कार
    • 1997 – फ्रांस सरकारचा ‘ ऑर्डर टू मेरिट अग्रिकोल’ पुरस्कार
    • 1999 – युनेस्को गांधी पुरस्कार
    • 2001 – लोकमान्य टिळक पुरस्कार
    • 1967 – पद्मश्री
    • 1972 – पद्मभूषण
    • 1989 – पद्मविभूषण
    • 2024 – भारत रत्न
  • डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी भूषविलेले पदे :
    • भारतीय कृषी संशोधन परिषद अध्यक्ष : 1972 ते 1974
    • अन्न व कृषी संघटना अध्यक्ष : 1981 ते 1985
    • आंतरराष्ट्रीय भारत संशोधन संस्था महासंचालक : 1982 ते 1988
    • राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापना : 2004 (स्वामिनाथन आयोग)
    • राज्यसभा सदस्य : 2007 ते 2013
    • IUCN अध्यक्ष : 1999

आतापर्यंतचे भारत रत्न पुरस्कार :

Current Affairs in Marathi

तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही WhatsApp ग्रुप / टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---

Related Post