Bank Recruitment 2024
Merchants Co-Op Bank Bharti 2024 – दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई अंतर्गत दि सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेड , नाशिक येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई अंतर्गत दि सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेड , नाशिक येथे ‘प्रशासकीय अधिकारी , लेखापाल , शाखा अधिकारी , अधिकारी आणि लिपिक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . MUCBF अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 016 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. www.rect-118.mucbf.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
Merchants Co-Op Bank Recruitment 2024
एकूण पदे : 016
पदांचे नाव : प्रशासकीय अधिकारी , लेखापाल , शाखा अधिकारी , अधिकारी आणि लिपिक
शैक्षणिक पात्रता :
- प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MS-CIT प्रमाणपत्र + बँका / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- लेखापाल (Accountant) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MS-CIT प्रमाणपत्र + बँका / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदाचा किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- शाखा अधिकारी (Branch Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MS-CIT प्रमाणपत्र + बँका / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- अधिकारी (Officer) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MS-CIT प्रमाणपत्र + बँका / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदाचा किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- लिपिक (Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MS-CIT प्रमाणपत्र (Equivalent Certification Course) (लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षांचा बॉण्ड तसेच 50,000/- रुपये इतकी रक्कम डिपॉझिट म्हणून बँकेत जमा करावी लागेल.)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- लिपिक : 944/- रुपये
- इतर सर्व पदे : 590/- रुपये
वेतन श्रेणी : 30,000/- रुपये ते 50,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : सटाणा (नाशिक)
अर्ज करण्याची तारीख : 14 मे 2024
How to Apply for Merchants Co-Op Bank Vacancy 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
- लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Merchants Co-Op Bank Bharti 2024
Merchants Co-Op Bank is recruiting for various posts. 016 vacant seats going to be filled by MUCBF. Last date to apply is 14 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mucbf.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!
नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!